पेनल्टी किक

सध्या विश्वचषक फुटबॉल सामने रंगात आले  आहेत. (जयन्ता५२,  फुटबॉल चे पायचेंडु / पदकन्दुक असे भाषांतर करणे जीवावर येते (मराठी भाषा प्रेमी असलो तरी ) 


पेनल्टी क्षेत्रात चुकीच्या पद्धतीने खेळाडूस अडवल्यास पंचाकडून शिक्षा म्हणून पेनल्टी किक बहाल करण्यात येते. त्याचबरोबर बाद फेरीतील सामन्यांचा निकाल लागावा म्हणून अतिरिक्त वेळेतही निकाल न लागल्यास प्रत्येकी ५ पेनल्टी शूटआऊट वर सामन्याचा विजेता ठरवला जातो. त्यातही निकाल न लागल्यास सडन डेथ ( अचानक मृत्यु हा शब्द वापरावा का?) चा अवलंब करतात. मला हे विचारायचे आहे की नेहमीच्या वेळेत पेनल्टी म्हणणे योग्य आहे,पण सामन्याचा निकाल ठरवण्याच्या वेळेस त्याला पेनल्टी का म्हणतात?


नियोजित वेळेत सामन्याचा निकाल न लावण्याबद्दल दोन्ही संघांना ही एक "शिक्षा " असते का?