रवा लाडू

  • रवा १ वाटी, खवलेला ओला नारळ अर्धी वाटी
  • साजूक तूप ४ चमचे,
  • १ वाटी साखर,
  • साखर बुडेल एवढे पाणी
३० मिनिटे
२ जणांना

मध्यम आचेवर रवा साजूक तुपावर तांबुस रंगावर भाजणे. रवा अर्धा भाजत आला की त्यात ओला नारळ घालून परत थोडे भाजणे.

साखर बुडेल इतके पाणी घालून पाक कराणे. पाक होण्यासाठी साखरपाणी या मिश्रणाला चांगली उकळी आली आणि ती विरली की गॅस बंद करून लगेचच भाजलेला रवा व नारळ पाकामध्ये घालून कालथ्याने चांगले ढवळणे. खूप गार झाले की मग लाडू वळणे.

पाक करताना रंग बदलेल. किंचीत पिवळसर दिसेल. खूप पक्का पाक नको.

एका वाटीत छोटे १० लाडू होतात.

रोहिणी

आवडत असल्यास यात बेदाणे व बदामाचे काप घालू शकता. एकतारी व दोनतारी पाक कसा ओळखावा हे मला माहित नाही, तेवढा अनुभव नाही. त्यामुळे जसा पाक केला तशीच कृती वर दिलेली आहे. याप्रमाणे लाडू खूप कडक होत नाहीत. नारळ घातल्यामुळे चवीला चांगले लागतात.

सौ आई