हलका की जड?

मनोगतींसाठी एक नवीन कोडे.


सारख्याच वजनाचे, आकार, प्रकार इत्यादी सर्वच बाबतीत एकदम सारखे असे आठ चेंडू आहेत. त्यांपैकी फक्त एक वजनात थोडा हलका किंवा जड आहे. तो शोधून काढायचा आहे. आणि हेही शोधून काढायचे आहे की तो इतरांपेक्षा हलका आहे की जड.


मात्र याकरता एक तराजू उपलब्ध आहे जो फक्त तीनदाच वापरायचा आहे. आणि या चेंडू व तराजू यांव्यतिरिक्त इतर कुठल्याही वस्तूंचा आधार घ्यायचा नाही आहे. तर हे कसे करता येईल?


ह्याचे उत्तर मला ८ जुलैपर्यंत व्यनितून पाठवावे.
८ जुलैला मी उत्तर लिहेन.