"ऱात्र"

रात्र अंधारी अंधारी एक दिवा नाही दारी..


तरीही झगमगते प्रकाशात तुझी आठवण ऊरी..


रात्र अंधारी अंधारी युगापरि वाटती क्षण ही..


भरुनी आले आभाळ, डोळे अन मन ही..


रात्र अंधारी अंधारी आकाशी ना चंद्र ना चांदणी..


आक्रंदते मन हे तरीही का कोरडीच पापणी..


रात्र अंधारी अंधारी लावते फासांवर फास..


जिवंत मी अन चालू श्वास जणू भासावर भास..


रात्र अंधारी अंधारी कधी होणार पहाट..


शुष्क डोळ्यांनी पाहतो तुझ्या परतीची वाट..