असहाय

हात हा हातात कोणी घेत नाही
मागतो आधार कोणी देत नाही

रात माझी सरत का नाही कधीही?
सूर्य का गावात माझ्या येत नाही?

भागली नाहीच तृष्णा काल माझी
काय दोस्ता,आज काही बेत नाही?

काळही नुसतीच वचने देत जातो
संगती नेतो म्हणे पण नेत नाही

प्रार्थनांचे ढीग हे दारात 'त्याच्या'
ऐकणारा 'तो' कुठे नजरेत नाही



(जयन्ता५२)