रिमिक्स आणि विडंबन

आपण व्यवहारात अनेकदा पाहतो की लोक रीमेक किंवा रीमिक्स च्या नावाने ओरडतात. अनेक मुद्दे काढतात. जसे चंगली जुनी चाल बिघडवली,सोज्ज्वळ गाणे थिल्लर बनवले, गायक संगीतकार व क्वचित्प्रसंगी नायकही हयात नसताना हे झाले हे बरे असे रीमार्क्स देतात.  या सर्व मतांशी मीसुद्धा ९०% सहमत आहे.


पण हा जो विचार संगीताच्या बाबतीत होतो,तो काव्याच्या का होऊ नये? याचे मला कोडे पडलेले आहे. एखाद्या सुरेख काव्याचे जेव्हा अनिर्बंध आणि हलके विडंबन होते, तेव्हा त्या काव्यामागच्या भावनेचा, मनःस्थितीचा व प्रत्यक्ष काव्याचा आपण अपमान करतो आहोत असे आपणास वाटत नाही का? व नसल्यास का नाही वाटत?


अर्थात विडंबनास माझा पूर्ण विरोध नाही. ज्याप्रमाणे एखादे गाणे मूळच्यापेक्षा री-मेक मध्ये जास्त चांगले वाटते तसे एखाद्या काव्याचेही असू शकते.   पण दिसलं काव्य की घ्या पेन. आयता आक्रुतीबंध आहेच तयार. त्यात बसणारे फुटकळ विनोद केले की झाले. हा attitude  मात्र बदलायला हवा असे मला वाटते. तरी याबद्दल आपले मत सांगावे.


                         --------स्वप्निल