गोकुळीचा चोर...

गोकुळीचा चोर याला बांधा उखळाला ॥ धृ.॥
अवचित कान्हा घरात शिरतो
दही दूध तूप चोरूनी खातो
धाक नाही याला बाई धाक नाही याला ॥ १ ॥
पाण्यासी जाता घागर फोडी
भर रस्त्यावर पदराला ओढी
लाज नाही याला बाई लाज नाही याला ॥ २ ॥
मुरलीधर हा नटखट भारी
खट्याळ काळा कृष्ण मुरारी
सोडू नका याला आता सोडू नका याला
चोरावरचा मोर याला बांधा उखळाला ॥ ३ ॥

'लोकगीत' हा प्रकार असायला हवा होता कवितांच्या लेखनप्रकारात.