माहितीतंत्रज्ञान कामगार कायदा

नमस्कार मनोगतींनो,
मी परदेशी.
मनोगतावर मी या नावाने कधी लिहीत नाही. मनोगताचा नियमीत वाचक आहे. पण आज माझ्या कचेरीमुळे एका कठीण प्रसंगात सापडलो आहे आणि तुम्हा साऱ्यांची मदत हवी आहे. काही खाजगी समस्यांमुळे व नोकरीतील सुरक्षिततेच्या भितीने मला माझी खरी ओळख लपवावी लागत आहे व कोणाला मी कोण याचा अंदाज आल्यास ओळख गोपनीय ठेवावी ही विनंती.


१. भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठीच्या कायद्यांची/कोणत्याही क्षेत्रातील अभियंत्यांना सरसकट लागू होऊ शकणाऱ्या कामगार कायद्यांची माहिती देणारे संकेतस्थळ सुचवू शकाल का? 


२. पुण्यातील कामगार कायद्यात तज्ज्ञ असणारे चांगले व अनुभवी वकील सुचवू शकाल का? (नाव पत्ते दिल्यास उत्तम.)