भरीत

  • लाल/पिवळ्या भोपळ्याच्या मध्यम आकाराच्या फोडी १५-२०
  • दाण्याचे कूट ६-७ चमचे,
  • चिरलेली कोथिंबीर ४-५ चमचे, मिरची १
  • लाल तिखट व साखर अदपाव चमचा, मीठ
  • दही ७-८ चमचे
  • फोडणीकरता तेल २ चमचे, मोहरी, हिंग, हळद
१५ मिनिटे
२ जण

लाल/पिवळ्या भोपळ्याच्या फोडी कूकरमध्ये थोडेसेच पाणी घालून उकडून घेणे. गार झाल्यावर त्यात दाण्याचे कूट, कोथिंबीर, साखर, दही व चवीनुसार मीठ घालणे. तेलाच्या फोडणीमध्ये एका मिरचीचे तुकडे व लाल तिखट घालून ती फोडणी भोपळ्याच्या फोडींवर घालून हे सर्व मिश्रण एकसारखे करणे. उकडलेल्या फोडी चमच्याने बारीक करणे.

उपासाला हे भरीत करतात.

सौ आई