साजुक तूप

  • "लॅन्डोलेक्सचे" मीठविरहीत स्वीट बटर
१५ मिनिटे
२ जण

एका पातेल्यात किंवा कढईत बटरच्या ४ कांड्या ठेवून गॅस अतितीव्र आचेवर ठेवणे. कांड्या पूर्ण वितळल्या की आच मध्यमाहून थोडी कमी करणे. बटर वितळायला लागले की फेस येईल. नंतर चमच्याने वितळलेले बटर सारखे ढवळत रहावे. बटर पूर्णपणे वितळल्यावर बरेच बारीक बारीक बुडबुडे येउन ते उकळायला लागते. नंतर या उकळलेल्या मिश्रणाला पिवळा रंग येईल. नंतर हळू हळू फेस कमी होईल. फेस पुर्णपणे जात नाही. नंतर एका क्षणी किंचित लालसर रंग आला की लगेच गॅस बंद करणे. हा क्षण महत्वाचा. तूप करताना सारखे ढवळत रहावे आणि रंग बघण्यासाठी तूप चमच्यामधे घेऊन पहाणे.

पूर्ण गार झाल्यावर तूप गाळून एका काचेच्या बाटलीत ओतणे. गाळले नाही तरी चालते. ४ कांड्या वितळून तूप होण्यासाठी बरोबर १५ मिनिटे लागतात.

रोहिणी

साजुक तूप प्रमाणात खाल्ले तर उपयुक्त आहे. साबुदाण्याची खिचडी, बटाट्याचा कीस, गोडाचा शिरा,  गाजर हलवा करताना किसलेले गाजर परतण्यासाठी, खीर करताना शेवया परतण्यासाठी किंवा असे बरेच पदार्थ करण्यासाठी साजुक तूप वापरावे. हानीकारक नाही. पदार्थ स्वादिष्ट बनतो.

भारतात माझी आई व अमेरीकेत तेलगू मैत्रिण सौ प्रविणा