दहशतवाद कि दहशती कावा?

आपण एखाद्या गोष्टीला काय नाव देतो ह्यावरुन आपल्या नकळत आपले त्या गोष्टींबद्दल काही ग्रह ठरतात. उदा. हिंदुत्ववाद, सापेक्षतावाद (relativity), चंगळवाद (consumerism), इत्यादी शब्दांना मराठीत 'वाद' ही संज्ञा लागू आहे. ह्या सगळ्या प्रकारांमागे काही विचारसरणी आहेत, आणि त्यामुळे ह्या वादांना एक प्रतिष्ठा आहे (म्हणजेच आपण त्या वादांचं अस्तित्व मान्य करुन त्याला एक बौद्धिक प्रतिष्ठेचं स्थान देतो), मग ते वाद सुरु करणारे किंवा त्यावर विश्वास ठेवणारे दुय्यम आणि त्या वादांचे गुण किंवा दुर्गुण महत्वाचे ठरतात.


इंग्रजी किंवा मराठीमध्ये दहशतवादाला अशा एका 'वादा'चे स्थान कसे मिळाले? इंग्रजी मधला terrorism हा शब्द सुद्धा वाद दर्शवणाराच आहे.


खरं म्हणजे दहशत पसरवणे ही काही मंडळींची युद्धनीती आहे, जसा गनीमी कावा तसा हा त्या मंडळींचा 'दहशती कावा' नव्हे का? आणि आपण दहशत वाद सोडून दहशती कावा असा विचार केला तर आपलं लक्ष आपोआप त्या काव्या मागच्या कर्त्यांकडे आणि त्यांच्या खऱ्या वादाकडे जाईल. म्हणजे अलिकडील बऱ्याचशा दहशती कारवायांमागचा वाद "काश्मिर प्रश्न" किंवा "मुसलमान धर्माविरुद्ध वागणाऱ्यांना शिक्षा"


ह्यावर सर्वांचे काय मत आहे?