त्यांच्या पोटाचे काय ?

घरेलू काम करणाऱ्या लहान मुलांचे जीवनमान उंचवावे म्हणून लहान मुलांकडून काम करण्यावर सरकारने १० ऑक्टोबरपासून बंदी घातली आहे. तसा आदेश मंगळवारी जारी करण्यात आला आहे. हा आदेश समाधानकारक असला तरी अनेक लहान मुले आपल्या घराचा भार उचलतात. त्याच्या पैशावरंच साऱ्या घराचे पोट भागते. त्याचे कामच बंद  झाल्यास साऱ्यांचे पोट कसे भरणार? हा विचार सरकारने केल्याचे दिसत नाही. त्यामुळे हा आदेश अन्यायकारक वाटतो. खेळ्ण्या-बागडण्याच्या वयात शिक्षण कुणाला नको वाटते? पण घरची परिस्थिती तशी असल्यास काय करणार? तुम्हाला काय वाटते?


गजानन दिवाण,


वरिष्ट उपसंपादक,


लोकमत, मुंबई.