होतो तसाच आहे मी... (गजल)


होतो तसाच आहे मी
अजुनी तुझाच आहे मी...


आशा कसली, वेडच हे!
वेडापिसाच आहे मी...


आयुष्याचा जुगार हा
हरलो बराच आहे मी...


मैफल सरली केव्हाची
बसलो उगाच आहे मी...


श्वास मोजतो उरलेले
थकलो अताच आहे मी...


वादळ येते पुनः 'अजब'
तरिही उभाच आहे मी...