मक्याचे कणीस घातलेली डाळीची आमटी

  • तूर डाळ १ वाटी
  • ओले खोबरे अर्धी वाटी (प्रमाणाची वाटी, खोबऱ्याची नाही)
  • १ कांदा अर्धा बारिक चिरून, अर्धा जाडा चिरून
  • काळे मिरी १ चमचा भरून
  • लिंबा एवढी चिंच कोळून पाणी
  • मक्याची कणसे ३ (प्रत्येक कणसाचे ३ भाग करून)
  • हळद, मीठ चवी नुसार
  • फोडणीचे साहित्यः मोहरी, हिंग, कडिपत्ता, हिरव्या मिरच्या
  • कोथिंबीर
३० मिनिटे
३-४
  • तूर डाळ धुऊन त्यात बारीक चिरलेला कांदा घालून कुकर मधून शिजवून घ्यावी.
  • खोबरे, जाडा कांदा व मीरी मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावी.
  • तुपावर हिंग, मोहरी, कडीपत्ता व हिरव्या मिरचीची फोडणी करावी.
  • त्यात कणसाचे तुकडे व २ वाट्या पाणी टाकावे. वरून मीठ व हळद घालावी.
  • अंदाजे ५ मिनिटांनी त्यावर चिंचेचे पाणी घालावे व कणसे शिजवावी.
  • आता शिजवलेली डाळ घालून एक उकळी आणावी.
  • यात खोबऱ्याचे वाटप घालून गॅस थोडा मंद करून उकळी आणावी.
  • वरून कोथिंबीर घालावी.
  • कणीस नसेल तर मुळा, टोमॅटो, शेवग्याच्या शेंगा घालून किंवा कुठल्याही भाजी शिवायही ही आमटी छान लागते.
  • माशाचा तळलेला तुकडा, भात आणि डाळीची आमटी यांची लज्जत वेगळीच.
  • मक्याची कणसे चिंचेच्या पाण्यात शिजवल्याने मका खाताना फारच सुंदर चव लागते.
आई - आमची सारस्वत पद्धत