जाहीर आभार

'अपरिचित तलत' या माझ्या लेखाच्या प्रतिक्रियेत तलतच्या मुलाखतीची तबकडी पाहिल्याचा सर्वसाक्षी यांचा प्रतिसाद होता. मी कित्येक दिवस या तबकडीच्या शोधात होतो. त्या तबकडीची एक प्रत मला पाठवण्याची मी सर्वसाक्षी यांना विनंती केली होती. त्याबरहुकूम त्यांनी मला त्या तबकडीची प्रत अगत्याने पाठवून दिली. ती मी पाहिली आणि वारकऱ्याला विठ्ठलभेटीचा आनंद व्हावा तसा मला आनंद मला झाला.
सर्वसाक्षी यांना केवळ व्य. नि. पाठवून त्यांचे ऋण फिटण्यासारखे नाही. 'घायल की गत घायलही जाने' असे काहीसे या बाबतीत असते. अशा गोष्टींचे लौकिक मूल्यमापन करता येण्यासारखे नसते, ते तसे करूही नये. 'मनोगत' ने मला खूप काही दिले आहे असे मी यापूर्वीच म्हटले आहे. सर्वसाक्षी यांच्या  या देणगीने याचा  परमोच्च बिंदू गाठला आहे. या निमित्ताने त्यांचे मी जाहीर आभार मानतो. याहून अधिक  काहीतरी करण्याची मला संधी मिळावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे.