मनोगतचे (ब्रीद)वाक्य..

नमस्कार मनोगतींनो,


मी भाग्यश्री, मनोगत वर तशी नवीनच आहे. प्रथमच काही लिहीत आहे. हे नक्की कुठल्या लेखन प्रकारात मोडते याचा संभ्रम आहे. पण जेव्हा मी मनोगत वर येते तेंव्हा मनोगतचे वाक्य दिसते, "मराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं". मला एक साधासा चं प्रश्न पडला आहे. तो म्हणजे, शेवटच्या "मराठी मानसं" मधले 'मानसं' काय सूचित करतो ? ग्रामीण भाषेमधील माणसे , की मानस?


तसा या प्रश्नाला काही विशेष अर्थ नाही, कुतूहल म्हणून विचारत आहे. शिवाय या निमित्ताने मनोगतींशी ओळख होईल.


धन्यवाद,


-भाग्यश्री कुलकर्णी.