बेसन लाडु - वेगळा प्रकार

  • ३ वाट्या बेसन
  • अर्धी वाटी रवा
  • अर्धी वाटी दुध
  • २ वाट्या साखर
१५ मिनिटे
२०-२२ लाडु

प्रथम मंद आच ठेऊन तुपावर बेसन व रवा एकत्र भाजुन घ्यावा. मग गॅस बंद करुन कोमट दुध घालावे. पराती मधे ओतुन मिश्रण कोमट असतानाच त्यात साखर घालावी व छान एकजीव करावे व लाडु वळावेत.

दुधामुळे खमंगपणा येतो व रव्यामुळे लाडु छान रवाळ होतात पण रव्याचे प्रमाण बेसनाच्या तुलनेत कमी असल्याने रव्याची चव लाडवात फारशी लागत नाही.

सौ.आई.