काळ्या वाटाण्याची उसळ

  • काळे वाटाणे १/२ किलो,पावभाजी सारखे मोठे पाव
  • कांदे ३ मध्यम आकाराचे,१/२ वाटी खोवलेले ओले खोबरे
  • टोमॅटो १ मोठा
  • दालचिनी,काळी मिरी अंदाजाने
  • लाल तिखट,मीठ,हिंग,हळ्द,तेल,गरम मसाला
  • कोथिंबीर,लिंबू वरून घालण्यासाठी,उभा चिरलेला कांदा बरोबर खाण्यास
३० मिनिटे
४ जण

काळे वाटाणे रात्रभर भिजत घालावे. सकाळी ते भिजले की कुकर मध्ये चांगले शिजवून घ्यावे.

२ कांदे मोठे चिरावे.एका भांड्यात तेल गरम करुन त्यात दालचिनी,काळी मिरी,चिरलेला कांदा,ओले खोबरे घालून ते सर्व  लाल होइपर्यंत परतावे,त्यात थोडा गरम मसाला घालावा.आता हे सर्व मिक्सर मध्ये पाणी घालून बारीक वाटून घ्यावे.

तिसरा कांदा  व टोमॅटो  बारीक चिरावा. तेलात हिंग,हळ्द घालुन फ़ोडणी करावी व त्यात हा बारीक कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यावा व नंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून ग्रेव्ही करावी.यात वाटलेला मसाला घालून परतावे. शिजवलेले काळे वाटाणे घालावे. चविप्रमाणे तिखट,मीठ व हवा असल्यास थोडा आणखी गरम मसाला घालावा. उसळ जितकी पातळ हवी तितके पाणी घालून चांगली उकळी येऊ द्यावी.

 

वाढताना बाउलमध्ये यावर चिरलेली कोथिंबीर घालावी आणि लिंबू,उभा चिरलेला कच्चा कांदा  व पाव यांच्यासोबत खावी.

फ़ारच सुंदर लागते.

माझी आई.