ऑगस्ट १२ २००६

शुभेच्छा

      जयंतराव,आगाऊ, तात्या यांनी मनोगतावर एक वर्ष पूर्ण केले. मनोगतींनी त्यांना वर्षपूर्तीच्या शुभेच्छाही दिल्या पण कधी? त्यांनी लक्षात आणून दिल्यावर. त्या ऐवजी त्यांचा मनोगतावरचा वाढदिवस लक्षात ठेवून आपणहून शुभेच्छा दिल्या असत्या तर त्यांचे मोल अधिक वाढले असते असे मला वाटते. तात्यांच्या प्रतिसादात प्रवासींच्या अशा प्रयत्नांचा उल्लेख आहे. प्रवासींची परंपरा पुढे चालू ठेवायची असेल तर काय करावे लागेल? सर्व सदस्यांची मनोगतावर दाखल होण्याची तारीख एके ठिकाणी कुठे मिळेल? ३-४ मनोगतींनी मिळून हा उपक्रम चालू केला तर तो फूलप्रूफ़ होईल असे मला वाटते. तुमचे काय मत आहे?
                                                                       वैशाली सामंत.

Post to Feed

आभार
स्वागत!

Typing help hide