'मनोगता'चे रेशनिंग: तुम्हाला हा त्रास होतो काय?

हल्ली मला मनोगत दिवसातून फक्त सकाळी जेमतेम तास-दीड तास आणि कधीकधी दुपारी आणखी एखादा तास-दीडतास एवढेच वापरायला मिळते. त्यानंतर - Too many requests! Please try later. असा संदेश मिळतो.

 

मध्यंतरी अशी एक 'थिअरी' ऐकण्यात आली होती की गूगलसारख्या शोधयंत्रांकडून असंख्य हिट्स येऊन त्यामुळे प्रशासकांचा खर्च वाढू नये म्हणून कोणत्याही आयपी पत्त्याकडून दिवसाकाठी ठराविक हिट्सपेक्षा अधिक न घेण्याची 'मनोगता'तच तरतूद करण्यात आली आहे. याबद्दल खरेखोटे माहीत नाही, परंतु जी काही तरतूद आहे ती 'मनोगता'तच आहे, हे निश्चित! कारण क्वचित घरून काम करताना कचेरीच्या जालास जोडलेला असताना हा संदेश आला, तर कचेरीच्या जालाऐवजी घरच्या आंतरजाल-कनेक्शनवरून मनोगत सुरळीतपणे मिळू शकते. (आणि vice versa. म्हणजे १. हा संदेश घरच्या किंवा कचेरीच्या कोठल्याही जाल-कनेक्शनवरून येऊ शकतो, आणि २. आयपी पत्ता बदलल्यास मनोगत सुरळीतपणे वाचता येते.)

 

पण मग दुसरी एक गोष्ट समजत नाही - जर दिवसाच्या ठराविक वेळांतल्या एकूण हिट्सची संख्या हाच जर एखाद्याला काही काळापुरता 'लॉक' करण्याचा निकष असेल, तर मनोगतावर खूप वेळ 'पडीक' (शब्दाबद्दल आगाऊ क्षमस्व!) असणाऱ्या सर्वांनाच ही समस्या कशी येत नाही? कारण आतापर्यंत मी आणि वैद्य/उद्धट/मिलिन्द भाण्डारकर या दोघांव्यतिरिक्त फारशी कोणाकडून ही तक्रार ऐकण्यात आलेली नाही. म्हणजे इतर ही समस्या येऊनसुद्धा त्याबद्दल बोलत नाहीत, की आम्ही दोघेच इथे नको तितका वेळ 'पडीक' असतो, की हा संदेश येण्यासाठी हिट्सच्या संख्येव्यतिरिक्तही आणखी काही निकष आहेत (की अशी काही 'खास यादी' आहे), कळायला मार्ग नाही.

 

तुम्हाला असा त्रास होतो का?

 

समजून घ्यायला निश्चित आवडेल, कारण मग येथे नेमके काय घडत आहे, यात काही method in the madness आहे का, हे तरी निश्चित समजेल! अर्थात खुद्द प्रशासकांनी खुलासा केल्यास उत्तमच, पण तरीही या समस्येने पीडितांच्या आकडेवारीबद्दल कुतूहल आहे. (मिलिन्दरावांच्या राखीव कुरणात घुसखोरी केल्याबद्दल आगाऊ क्षमाप्रार्थना!)


अवांतर: नेटकॅफेमधून 'मनोगता'वर येणाऱ्यांचे नेमके काय होत असेल, हा एक प्रश्नच आहे!.

 

- टग्या.