झटपट आमटी वा डाळीचे पराठे

  • १-१.५ वाटी आमटी अथवा दाल फ्राय (१ दिवस शिळं असेल तरी चालेल/पळेल)
  • ३-३.५ वाट्या कणीक
  • ३-४ चमचे डाळीचं पीठ (बेसन)
  • चवीनुसार मीठ, धने-जीरे पूड
३० मिनिटे
३-४

वरील जिन्नस एकत्र करून पोळीच्या कणकेप्रमाणे भिजवावे.

गरजेनुसार पाणी व हवे असल्यास तेलाचा हात लावावा.

गरम गरम पराठे लोणचे/चुंदा/चटणी सोबत खावे.

सुट्टीच्या दिवशी उशिरा उठल्यावर नाश्त्यासाठी पटकन तयार होतात.

 

पराठ्याला पापुद्रे सुटण्यासाठी युक्तीः

पोळीपेक्षा मोठा गोळा घेऊन छोटी पोळी लाटावी.

या छोट्या पोळीत एका त्रिज्ये एवढी (radius) सुरी/चमच्याने भेग करावी.

याचा द्रोण करून तो चपटा करावा, मग पराठा लाटावा.

द्रोण करताना जितके स्तर (layers) येतात, तितके पराठ्याला पापुद्रे छान सुटतात.

सासुबाई उर्फ काकू - सौ. अपर्णा कुलकर्णी