शेवयांचा उपमा

  • २ वाट्या शेवया (मॅगी मधल्या पण चालतात)
  • १ टोमॅटो
  • चिंचेचा कोळ (चिंच लिंबाएवढी घ्यावी)
  • ४-५ मिरच्या
  • १ टेबल स्पुन तेल
  • चवीसाठी मिठ ,साखर
१५ मिनिटे
२ माणसांना

प्रथम तेल गर्म करुन घ्यावे. त्यात बारीक चिरलेल्या मिरच्यांचे तुकडे टाकावेत. मग त्यात शेवया टाकुन जरा परतवुन घ्याव्यात. मग त्यात बारीक चिरलेला टोमॅटो टाकावा, टोमॅटोला किंचित पाणी सुटले की चिंचेचा कोळ घालावा. गरज भासल्यास अगदी थोडे पाणी घालावे. थोडा वेळ शिजू द्यावे (१-२ मिनिटे), चविनुसार मिठ व चिमुटभर साखर घालावी.

 

हा उपमा गरम-गरम चांगला लागतो म्हणुन आयत्यावेळी करावा.

maggie च्या शेवया वापरायच्या झाल्यास १ पाकिट १ माणसाला हे प्रमाण घ्यावे, व त्या शेवया बारीक करुन घ्याव्यात (हाताने चुरुन घ्याव्यात). मात्र ह्या maggie च्या शेवया घेतल्यास त्यात दिलेला मसाला फुकट जातो कारण आपण आपल्या पाककृति मधे त्याचा वापर करीत नाही.

एक वेगळी पर म्हणुन सगळ्यांना आवडतो.

सौ.आई.