संगणकावर मराठीत लिहिण्याबद्दल काही

संगणकावरील मराठीचा वापर जसजसा वाढत जात आहे तसतसे मराठी लिहिण्याच्या
नवनवीन पद्धती अस्तित्वात येत आहेत. बरेच लोक "बराहा डायरेक्ट" हा संगणक
कार्यक्रम वापरून युनिकोडच्या साहाय्याने मराठीत लिहितात. आता "बराहा
डायरेक्ट" च्याच
निर्मात्यांनी "बराहा डायरेक्ट" पेक्षाही वापरायला सोपे असणारे "बराहा
आय.एम.ई." (BarahaIME) हे "बराहा डायरेक्ट"चे संक्षिप्त स्वरूप काढले आहे.

अगोदर आम्ही सुचविलेल्या "बराहा डायरेक्ट" मध्ये युनिकोडशिवाय इतर संगणकीय
मुद्रिकरणाचे (जसे ANSI) पर्याय उपलब्ध होते. परंतु आजकालच्या संगणकीय
मराठी वापरात युनिकोड हीच सर्वमान्य पद्धत म्हणून सिद्ध झाली आहे. "बराहा
आय.एम.ई" हे "बराहा डायरेक्ट"सारखेच परंतु फक्त युनिकोडकरिता मर्यादित
बनविले आहे. त्यामुळे त्या कार्यक्रमाचा आकार बराहा डायरेक्टपेक्षा कमीच
आहे. शिवाय नव्याने मराठी वापरायला शिकणाऱ्यांना युनिकोड की ऍन्सी (ANSI)
ह्या पर्यायामधील कुठले पर्याय वापरावे ह्या अडचणीत पडण्याचा धोका बराहा
आय.एम.ई द्वारे नाहीसा झाला आहे.  बराहा
आय.एम.ई हे बराहाच्या संकेतस्थळावरील http://www.baraha.com/BarahaIME.htm ह्या पानावरून उतरवता येईल.

स्रोत ः मराठी ब्लॉग विश्व

http://www.marathiblogs.net/node/2867