लोकप्रतिनिधींचे अगाध ज्ञान

लोकप्रतिनिधींचे अगाध ज्ञान


दि. १५ ऑगस्ट रोजी इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांनी संसदेबाहेर पडणाऱ्या खासदारांना काही प्रश्न विचारले. शालेय विद्यार्थी सुद्धा या प्रश्नांची अचूक उत्तरे देऊ शकतील असे ते प्रश्न होते.पण त्यांची उत्तरे देताना खासदारांची तारांबळ उडाली आणि त्यांनी आपले अगाध ज्ञान प्रकट केले. ते प्रश्न होते
१) गांधीजींचे पूर्ण नाव काय?
२) आपले राष्ट्रगीत कोणी रचले?
३) राष्ट्रध्वजावरील चक्र कुठून घेतले आहे?


खासदारांनी दिलेली उत्तरे (अर्थात हिंदीतून)
१)  
- महात्मा गांधी हे त्यांचे नाव होते
- पूर्ण नाव काय करायचे आहे? आम्ही त्यांना बापूजी म्हणतो / राष्ट्रपिता म्हणतो. तेवढे पुरेसे आहे.
- (स्मरणशक्तीला खूप ताण देऊन) करमचंद गांधी


२)
- कोणीतरी चटर्जी होते
- खूप राष्ट्रगान आहेत. नेमके कोणते?
- एका खासदाराने मात्र नुसतेच टागोर असे सांगितले.


३)
 - मालूम नही कहाँसे लिया है
 - त्यातील आरे ही देशातील राज्यांची प्रतीके आहेत.


लहानपणी शालेय अभ्यासात शिकलेली प्रत्येक गोष्ट लक्षात राहतेच असे काही नाही.पण एवढी सोपी माहिती त्यांच्या लक्षात रहात नसेल तर (केव्हातरी माहित असेल असे गृहित धरून) आपला मतदारसंघातील जनतेलाच काय पण मतदारसंघाचे नावही विसरून गेल्यास नवल ते काय?


आपल्यापैकी कुणी हा कार्यक्रम पाहिला असल्यास अनुभव जरूर कळवावेत.