भेट नजरांची...

भेट नजरांची जरी पहिलीच आहे
काळजाची मागणी भलतीच आहे

मानले बदनाम होता तो किनारा
लाट ही थोडी तरी चळलीच आहे

अत्तराचे काय आता काम आहे?
माझिया श्वासात तू भिनलीच आहे


बहरला प्राजक्त स्वप्नांचा असा की
वेचण्याला रात ही अपुरीच आहे

रंगली ही स्पंदनांची जुगलबंदी
आणि लय गात्रातली चढतीच आहे


 


(जयन्ता५२)