साहाय्य

प्रश्न: मला इथे एक दुवा (वेबलिंक) द्यायचा आहे, कसा देऊ?
उत्तर:  समजा आपल्याला www.google.com हा दुवा 'गूगल शोधयंत्र येथे टिचकी मारावी' असा द्यायचा असेल तर खालीलप्रमाणे तो देता येईल:



  • आधी साध्या खिडकीत दुवा लिहा.
  • त्यानंतर HTML फेरफार यावर टिचकी मारा.
  • येथे आपला दुवा दोनदा उमटलेला दिसेल. त्यातील दुसर्‍यांदा उमटलेला दुवा खोडून त्या जागेत आपले शब्द लिहा उदा० 'गूगल शोधयंत्र' असे लिहा.
  • त्यानंतर पुन्हा HTML फेरफार यावर टिचकी मारा. साध्या खिडकीत इतर लेखन करून परिच्छेद पाडून सुपूर्त करा.

प्रश्न: नवीन वाक्य नवीन ओळीवर कसे लिहू?
उत्तर: त्यासाठी शिफ्ट आणि एंटर ह्या कळी (keys) एकत्र दाबा.


प्रश्न: परिच्छेद कसे पाडू?
उत्तर: त्यासाठी एंटर ही कळ (key) दाबा.


प्रश्न: मला इथे नीट टंकलेखन (type) करायला जमत नाही.
उत्तर: नवीन लेखन किंवा प्रतिसाद ह्यावर टिचकी मारा.  'देवनागरी टंकलेखन साहाय्य' असे एक चित्र दिसेल. ह्या चित्रावर टिचकी मारली तर कुठल्या अक्षरासाठी काय टाईप करायचे त्याचा तक्ता दिसतो, त्यात पाहायचे (आता इथेच टिचकी मारून पाहा!)  त्याशिवाय नवख्या माणसाच्या हातून नेहमी होणार्‍या टंकलेखनातील चुका येथे देत आहोत त्या एकदा वाचून घ्या:



  • झ - 'माझे' हा शब्द 'माज़े' असा उमटतो. z ची कळ वापरल्याने असे होते. कृपया झ साठी jh वापरा.
  • ण - 'बाण' हा शब्द 'बान' असा उमटतो. n ची कळ वापरल्याने असे होते. कृपया ण साठी N वापरा. त्याप्रमाणेच ट, ठ, ड, ढ, ष, ळ साठी कृपया अनुक्रमे T, Th, D, Dh, Sh, L अशी कॅपिटल अक्षरे वापरा.
  • अर्धा र - 'होणार्‍या' हा शब्द 'होणार्या' असा उमटतो. r ची कळ वापरल्याने असे होते. र्‍य (होणार्‍या), र्‍ह (तर्‍हा) साठी कृपया R वापरा.
  • अनुस्वार - 'वंदन' हा शब्द 'वन्दन' असा उमटतो. n ची कळ वापरल्याने असे होते. अनुस्वारासाठी कृपया .n (टिंब एन) वापरा.
  • ऋ - 'कृती' हा शब्द 'क्रुती' असा उमटतो. ru ह्या कळी वापरल्याने तसे होते. कृपया ऋ साठी Ru वापरा.
  • 'नाटकात' हा शब्द 'नाट्कात' असा उमटतो. ट नंतर a न दाबता k  दाबतात त्यामुळे असे होते. ट नंतर a दाबल्याने 'नाटकात' असे उमटेल. शब्दातील शेवटचे सोडून इतर सर्व अक्षरे पूर्ण करण्यासाठी a किंवा इतर कोणता ना कोणता स्वर दाबणे आवश्यक आहे.

प्रश्न: व्यक्तिगत निरोपाचे उत्तर देताना आलेल्या निरोपाच्या डाव्या बाजूस एक उभी निळी रेघ येते पण ती उत्तराच्या मजकुरातही तशीच चालू राहते. उत्तरात ती येऊ नये म्हणून काय करू?
उत्तर: बाजूची निळी रेघ ही मूळ निरोपातील मजकूर उद्धृत करण्यासाठी आहे. त्या उद्धृत मजकुरात जर आपल्याला मध्येच त्यातल्या काही मजकुरास संदर्भून लगोलग तिथेच प्रत्युत्तर लिहायचे असेल, तर तिथे एंटर (enter) कळ (key) दाबून दोन नवीन परिच्छेद पाडा. असे केल्यावर ह्या दोन नव्या रिकाम्या परिच्छेदांपैकी मधल्यात या. 'समासातून बाहेर' ह्या चित्रावर टिचकी मारल्यास तो परिच्छेद बाहेर येईल. आता आपले उत्तर 'निळ्या रेघेच्या बाहेर' आलेले दिसेल.


प्रश्न: टंकलेखनातील तसेच शुद्धलेखनातील चुका दुरुस्त करण्यासाठी काय करू?
उत्तर: लेखन सुपूर्त करण्याआधी गमभ आणि बरोबरची खूण असलेल्या चित्रावर टिचकी मारून शुद्धलेखन चिकित्सक वापरा. नियमितपणे शुद्धलेखन चिकित्सकाचा वापर करा.


ऋणनिर्देश - हा लेख प्रशासक महाराजांच्या सहकार्याने लिहिला आहे.