वरण भाताचे थालिपीठ

  • तुरीच्या डाळीचे वरण १ वाटी
  • भात १ वाटी
  • लाल तिखट १ चमचा, कांदा अर्धा
  • अर्धा चमचा हळद, चवीपुरते मीठ
  • गव्हाचे पीठ १ वाटी, हरबरा डाळीचे पीठ अदपाव वाटी
  • तेल, चिरलेली कोथिंबीर मूठभर
१५ मिनिटे
२ जणांना

आदल्यादिवशी उरलेले वरण व भात यामध्ये गव्हाचे पीठ, डाळीचे पीठ, हळद, तिखट, मीठ, कोथिंबीर, व कांदा बारीक चिरून घालणे. वर दिलेले गव्हाचे व डाळीचे प्रमाण कमी-जास्त लागेल त्याप्रमाणात घेणे.  थालिपीठ थापता यावे इतपत पीठ मिसळावे.  थोडासा तेलाचा हात घेऊन थालिपीठ भिजवणे. वरण भात पण जसा उरेल त्याप्रमाणे.  हे थालिपीठ चविष्ट व कुरकुरीत लागते. थालिपीठ लावताना तेल जरा जास्त घालावे म्हणजे खरपूस भाजले जाते व चवीला खमंग लागते.

तुरीच्या व मुगाच्या डाळीच्या वरणाचे वेगवेगळे थालिपीठ करून पाहिले. पण इतके चविष्ट लागले नाही. पण वरण भाताचे चवीला खूपच छान लागले.

स्वानुभव