महाजालावरचे वाचनालय मराठीतही

मित्रहो, नमस्कार.


पुस्तकांचे महत्त्व मी आपल्याला समजावून सांगण्याची गरज नाही, आपण ते जाणताच. मात्र पुस्तके मिळवण्यात नि वाचण्यात अनेक आर्थिक (पुस्तकांची किंमत न परवडणे), भौगोलिक (लहान गावात पुस्तके उपलब्ध नसणे) अशा अडचणी येतात. तेंव्हा माहितीचे महाजाल या नवीनं व विश्वव्यापी माध्यमाचा उपयोग याकामी करून घेता येईल हे ओळखून अनेक महाजाल वाचनालये सुरू झाली आहेत. असेच एक इंग्रजी भाषेतले ग्रंथागार http://www.gutenberg.org/ इथे आहे. इथे ज्या पुस्तकांचा स्वामित्वहक्क संपून ती लोकांच्या मालकीची झाली आहेत, अशी पुस्तके उपलब्ध आहेत.


असेच एक महाजालावरचे वाचनालय मराठीतही सुरू करावे असे मला वाटते. आपण मनोगती याबाबतीत काय म्हणता ?


*****************************


एक_वात्रट ह्यांचा लेख वाचल्यावर मला वाटले हा उपक्रम मी स्वतःच हाती घ्यावा. पण ह्या साठी मला तुम्हा सर्वांची मदत हवी आहे. व मला असे वाटते की सर्व मनोगती मला खुल्या मनाने मदत करतील.. ह्याच अपेक्षेने मी माझी इच्छा मनोगतावर ठेवलेली आहे....


१. अनामिका.को.इन हे नाव माझ्याकडे आहे.
२. मला हे संकेतस्थळ मराठी मध्ये तयार करावयाचे आहे
३. मला युनिकोड मध्ये मदत हवी.
४. मला डाटाबेस मध्ये ही मदत हवी आहे.
५. ह्या संकेतस्थळाचा सर्व खर्च मी स्वतः वहन करणार असून ही मी ह्याला सार्वजनिक कार्यासाठी वापरणार आहे कारण माझ्यापुढील पिढी साठी... मराठी साहित्यासाठी


 


 आपलाच ,


शनी