सप्टेंबर २००६

दुवा (वेबलिंक) कसा द्यावा?

मला इथे एक दुवा (वेबलिंक) द्यायचा आहे, कसा देऊ?

समजा,

"अधिक माहितीसाठी देवनागरी.नेट हे संकेतस्थळ पाहा" असे वाक्य लिहायचे आहे आणि देवनागरी.नेट ह्या साध्या अक्षरांऐवजी देवनागरी.नेट या संकेतस्थळाचा दुवा द्यायचा आहे.

त्यासाठी,

1. आधी नेहमीच्या खिडकीत हवे ते वाक्य ("अधिक माहितीसाठी देवनागरी.नेट हे संकेतस्थळ पाहा") लिहा.
2. खिडकीवर असणाऱ्या यादीतील "HTML फेरफार" निवडा. ("HTML फेरफार" च्या शेजारी डावीकडे असणाऱ्या चौकोनावर टिचकी मारा.)
3. "HTML फेरफार" खिडकीत तेच वाक्य दिसेल. त्यात ज्या शब्दांचे दुव्यात रूपांतर करायचे आहे त्याच्या भोवती
शब्द
लिहा.
आपल्या उदाहरणात,
देवनागरी.नेट
असे लिहा.
4. आता "HTML फेरफार" वर टिचकी मारल्यास पुन्हा नेहमीची खिडकी दिसेल, आणि आपले वाक्य,
आता,
"अधिक माहितीसाठी देवनागरी.नेट हे संकेतस्थळ पाहा"
असे दिसेल.

शब्द हे लक्षात ठेवल्यास दुवे देणे अगदी सोपे आहे. सुरुवातीला हे लक्षात ठेवणे कठीण वाटेल पण सरावाने जमून जाईल.

आणखी काही उदाहरणे,

"HTML फेरफार" मध्ये असे लिहा साध्या खिडकीत असे दिसेल
इ-सकाळ इ-सकाळ
मनोगत.कॉम मनोगत.कॉम
फ्लिकर.कॉम फ्लिकर.कॉम
गूगल.कॉम गूगल.कॉम

Post to Feed
Typing help hide