सप्टेंबर २००६

मजकुरात चित्रे कशी चिकटवायची?

आधी मजकूर लिहून नंतर त्यात आपल्याला हवे तेथे चित्र अंतर्भूत करणे सोपे जाते. आपल्या मजकुरात जेथे चित्र अंतर्भूत करायचे असेल तेथे दर्शक ठेवून

 • संपादकाच्या खिडकीच्या वर दिसणाऱ्या ह्या चित्रावर टिचकी मारावी.
 • उघडणाऱ्या मसुद्यात चित्राचा स्रोत द्यावा.
 • स्रोत दिल्यावर त्याखाली दिलेल्या दुव्यावर टिचकी मारून ते चित्र त्या मसुद्यात उघडून पाहावे.
 • चित्राची रुंदी वगैरे इतर माहिती आवश्यकतेप्रमाणे भरून मसुदा सुपूर्त करावा.
 • असे केल्यावर ते चित्र संपादकाच्या खिडकीत उघडते.

१: चित्राचा स्रोत कोठे मिळेल? आंतरजालावर दिसणाऱ्या पानांत चित्राचा पत्ता (स्रोत) एचटीएमएल मध्ये <img src = "..............."/> असा लिहिलेला असतो. तो मिळवण्यासाठी काही सोपे (आणि बिनचूक) उपाय आहेत. आपल्याला हवे असलेले चित्र कोठे आहे त्यावर ते अवलंबून आहे.

तुम्हाला हवे असलेले चित्र कोठे आहे?

 फ्लिकर चित्रसंग्रहात

फ्लिकर सुविधेची माहिती

 • त्या चित्रावर टिचकी मारावी, म्हणजे थोड्या मोठ्या आकारात तेच चित्र असलेले दुसरे पान दिसेल.
 • त्या चित्रावर असणाऱ्या यादीतील (मेन्यूतील) "ALL SIZES" वर टिचकी मारावी.
 • आता तेच चित्र वेगवेगळ्या आकारात दाखवणारे पान दिसेल.
 • त्यातील चित्राखाली असलेल्या "Grab the photo's URL"मधील दुव्याची प्रत बनवावी (कॉपी करावी)
 गूगल पिकासावेब संग्रहात

पिकासावेब सुविधेची माहिती

 • गूगल पिकासावेबच्या आपल्या पानावर जाऊन हवा तो चित्रसंग्रह टिचकी मारून निवडावा
 • उघडलेल्या चित्रसंग्रहातले आपल्याला हवे ते चित्र टिचकी मारून निवडावे.
 • उघडलेल्या चित्राच्या पानावर उजवीकडच्या स्तंभात निरनिराळे पर्याय दिसतात त्यातला Embed Image ह्या पर्यायाकडे लक्ष द्यावे.
 • तेथेच खाली Select size मध्ये चित्राचे हवे ते आकारमान निवडावे आणि Image only (no link) हा पर्याय त्याच्या चौकटीत टिचकी मारून निवडावा.
 • अशी सर्व निवड केली की त्याच्या लगोलग वर Embed Image ह्या रकान्यात चित्राचा अनुरूप स्रोत तयार होतो, तो मूषकाने निवडून त्याची प्रत घ्यावी.

अधिक माहिती

 • वरीलप्रमाणे मिळालेला स्रोत पुरेसा असला तरी तो त्याहून अधिक लवचिकपणे वापरता येतो.
 • तो (प्रत घेतलेला) स्रोत आपल्या न्याहाळकाची नवी खिडकी किंवा नवा खण उघडून त्याच्यात चिकटवावा, म्हणजे ते चित्र तेथे दिसेल.
 • ह्या स्रोतात ....../s144/....  किंवा .../s400/.... असा भाग दिसेल. ह्या भागाने चित्राचे आकारमान निश्चित होते. तो (स्रोतातला तेवढाच भाग) बदलून ..../s800/.... किंवा ..../s1600/... असे करून निरनिराळ्या आकारमानात चित्र उघडता येते. (अर्थात मूळ आकारमानापेक्षा मोठे आकारमान कधीच मिळत नाही!) येथे काही ठराविकच आकडे (आकारमाने) चालतात ती अशी : 94, 110, 128, 200, 220, 288, 320, 400, 512, 576, 640, 720, 800, 912, 1024, 1152, 1280, 1440, 1600

आणखी अधिक माहिती

 आंतरजालावर
 • आंतर्जालावरच्या एखाद्या पानात जे चित्र अंतर्भूत केलेले दिसते त्यावर मूषकाच्या उजव्या बटणाने टिचकी मारावी.
 • असे केल्याने उघडणाऱ्या मेनूत 'प्रॉपर्टीज' हा पर्याय निवडावा.
 • उघडणाऱ्या खिडकीत लोकेशन पुढे जी माहिती दिलेली असते तो त्या चित्राचा स्रोत (http://www......gif वगैरे. ... gif ऐवजी jpgकिंवा png असेही प्रकार असतील.) वगैरे. (gif ऐवजी jpgकिंवा png असेही प्रकार असतील.)
 • त्या माहितीवर मूषक ओढून त्या माहितीची प्रत घ्यावी. (बऱ्याच वेळा स्रोत लांबलचक असतो. अश्या वेळी खिडकीचा आकार वाढवून घेऊन संपूर्ण स्रोताची प्रत घेणे सोपे जाते.)
आपल्या संगणकावर
चित्र आपल्या संगणकावर असेल तर ते आपण जालावर कोठेतरी आस्थापित केल्याशिवाय ते इतरांना दिसणार नाही. त्यासाठी पिकासावेब किंवा फ्लिकर ह्या किंवा जालावर उपलब्ध असणाऱ्या तश्या इतर अनेक सुविधांपैकी एखादीचे सदस्य होऊन त्यांच्या चित्रसंग्रहात आपले चित्र ठेवावे आणि त्याचा दुवा वर वर्णन केल्याप्रमाणे वापरावा. आपल्याला माहीत असलेल्या अश्या एखाद्या सुविधेची माहिती येथे द्यावी असे वाटत असल्यास कळवावे म्हणजे त्या सुविधेची पाहणी करून पिकासावेब आणि फ्लिकरप्रमाणे काही विशिष्ट मार्गदर्शन देणे शक्य होईल.

Post to Feedप्रयत्न
दुवा असा हवा.
मार्गदर्शन
प्रात्यक्षिक
दुसरा प्रयोग
चित्रे/फ्लिकर/आकार
एक प्रयत्न- माझाही!
मजकुरात चित्रे कशी चिकटवायची?
मजकुरात चित्रे
इथे चित्रे मिळतील
माझाही एक प्रयत्न
फ़्लिकरवरुनसुद्धा लिंक देणे जमत नाही...
ग्रॅब द फोटो यूआरएल विषयी
जमले....धन्यवाद..!
चित्र कसे चिकटववावे?
चित्रे कोठे आहेत?
संगणकावर आहेत
चित्र आपल्या संगणकावर असेल तर
चित्र टाकण्यया चे चिन्ह कुठे आहे नेम के?
चित्र टाकण्यया चे चिन्ह कुठे आहे नेम के?
फायरफॉक्स वापरा. क्रोम मध्ये प्रोब्लेम आहे.

Typing help hide