बेल्जियम कहाणी-२

        विमानतळावरून आम्ही charleroa या शहरात निघालो. गाडीमध्ये झालेल्या गप्पांवरून असे लक्षात आले की या लोकांना भारताबद्दल माहिती तर सोडा पण गैरसमजच जास्त आहेत. कारण मला माझ्या बाबांनी विचारले की काय मग तुमच्याकडे घरी हत्ती असेल ना! मी तर या प्रश्णाने चक्रावून गेले.हा प्रश्ण म्हणजे काही गंमत नव्हती हं! 


       नंतर मला कोणितरी हा प्रश्ण विचारला की तुमच्याकडे हॉटेल आहेत का? आता या प्रश्णाचे काय उत्तर देणार. आपल्या इथे गल्लो-गल्ली हॉटेल्स निघतात आणि ती कोणत्याही वारी बघा, तुडूंब भरलेली असतात.मला तर ही गर्दी पाहून असे वाटते कि कोणी घरी जेवते की नाही.


        अशा या गप्पांमध्ये एक तास कसा निघून गेला, मला कळलेच नाही. तेव्हा आम्ही charleroa ला पोहोचलो होतो.