सप्टेंबर २००६

पृथ्वीवर माणुस 'उपरा'च?

कालच डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णींचे 'पृथ्वीवर माणुस उपराच' (परत) वाचले.मोकळा वेळ मिळाला की मी हे पुस्तक वाचतेच. जेव्हा जेव्हा मी हे पुस्तक वाचते, मला खुप प्रश्न पडतात. बर्याच जणांनी हे पुस्तक वाचलेही असेल.त्यामुळे या विषयावर चर्चा प्रस्ताव मांडायचे ठरवले. ज्यांनी हे पुस्तक वाचले नाही त्यांच्यासाठी ही थोडी माहीती..

खूप वर्षांपुर्वी ( साल नक्की ठाऊक नाही, परंतु साधारण पणे १९९३ च्या आसपास असावे.) डॉ.नाडकर्णींनी सकाळ मधे ही लेखमाला लिहीली होती. त्या लेखमालेचे हे पुस्तकरुप. एरीक व्हॉन डॅनिकेन या स्विस संशोधकाचे आगळे-वेगळे संशोधन आणि त्यावरील त्यांचे लेख ही नाडकर्णींच्या लेखमालेची( आणि पुस्तकाची) प्रेरणा असावी.
डॅनिकेन यांच्या संशोधनाप्रमाणे माणुस हा पृथ्वीवरचा नाहीच. खुप पुर्वी या पृथ्वीवर UFO (उडत्या तबकड्या) मधुन extra-terrestrials (कदाचित देव ?)इथे आले. जे खुप प्रगत होते. त्यांनी Genetics Engg सारखे तंत्र वापरुन मानव निर्माण केला (असावा).

हे सर्व 'काहीही' वाटण्याचा खुप संभव आहे. परंतु डॅनिकेन नी जे पुरावे दाखवले ते पाहील्यावर मात्र यावर थोडा-बहुत विश्वास बसायला लागतो.

पहिली गोष्ट म्हणजे, मानवाची उत्पत्ती. डार्वीनच्या सिद्धांताप्रमाणे ड्रायोपिथेकस या सस्तन प्राण्याच्या ३ उपजाती निर्माण झाल्या. ड्रायोपिथेकस पंजाबाय पासून गोरिला , ड्रायोपिथेकस जर्मनाय पासून चिंपांझी आणि ड्रायोपिथेकस डार्विनाय पासून मानव निर्माण झाला.ड्रायोपिथेकस हा २-२.५ फूटी, चतुष्पाद, आणि सुमारे दीड-दोनशे सेमी चा मेंदू असलेला प्राणी.याच्या एका उपजातीपासून जो मानव झाला तो मात्र, ५.३-६ फूटी,द्विपाद, आणि २००० घनसेमी आकाराचा प्रचंड मेंदू असलेला असा.या नाट्यपुर्ण स्थित्यंतराबद्दल (डार्विनसह) सर्वच शास्त्रज्ञ मौन बाळगतात.विकाससिद्धांताप्रमाणे हया सर्व बदलांचे अवशेष सापडले पाहीजेत, परंतु या स्थित्यंतराचे एकही अवशेष सापडत नाहीत.

 1.  मांसाहारी प्राणी निर्माण होताना मांजर,रानमांजर,वाघ ( तॄणाहारी मधे झेब्रा,घोडा,गाढव )ई. एकमेकांसदृश अनेक प्राणी निर्माण झाले. परंतू मानव निर्माण होताना मानवाला समांतर प्राणी नाही झाला.
 2. जगातील सर्व प्राणी निशाचर अथवा दिनचर अशी वैशिष्ट्ये घेउन येतात. मानवाला तेही नाही.
 3.  आहाराच्या बाबतीत मांसाहारी,शाकाहारी,तॄणाहारी,कीटकाहारी ई. वैशिष्ट्ये आहेत. मानवाला नाहीत.
 4. संरक्षणासाठी प्राण्य़ांना शिंगे,दात,नखे, अशी आयुधे जन्मतः लाभली आहेत. मानवाला नाहीत.
 5. कोणत्याही प्राण्याचे अपत्य अल्पकाळात स्वतंत्रपणे जगू लागते. मानवाचे मात्र वर्षानुवर्षे आई-बापांवरच अवलंबुन पराधीन जिणे जगत असते.
 6. सगळ्यात महत्वाचे म्हणजे सर्व प्राणी फ़क्त वर्तमानकाळात जगत असताना मानव हा एकच प्राणी असा आहे, की जो कोणतीही शारीरिक कुवत नसताना भूत-भविष्याचा विचार करीत सर्व जगावर स्वामित्व मिळवण्याचा सतत प्रयत्न करत असतो.

मानवाची उत्पत्ती जरा बाजुला ठेवली तरी काही प्रश्न पडतातच, ज्या काळात मानवाला चाकाचा शोधही लागला नव्हता त्या काळात सापडलेले बांधकाम किंवा चित्रे, शिल्पे पाहील्यावर आश्चर्यचकीत होण्याची वेळ येते. उदा.

 1. ईजिप्तमधले पिरॅमिडस, त्यांची शास्त्रीय रचना,पायाची अशी बांधणी की  ज्यामुळे पृथ्वीवरील जमिन आणि पाणी यांची समान भागणी व्हावी,त्यांचा 'पाय' या गणितातील सर्वात स्थिर संख्येशी असलेला संबंध, पिरॅमिडच्या आतुन वर पाहीले तर एखाद्या नक्षत्रावर अथवा तार्यावर केंद्रीत होणे,पिरॅमिडमधुन किरणोत्सर्ग बाहेर पडणे...... ई.
 2. ऍडमिरल पिरी रीस याने तयार केलेला जगाचा नकाशा. त्यात आत्ता आत्ता ज्याचा आकार नीट कळला आहे अशा अंटार्क्टीका चा आकार अगदी तंतोतंत आहे. खुप उंचीवर गेल्याखेरीज हे जमणार नाही. चाकाचा शोध लागला नव्हता त्या काळात या लोकांना खगोलशास्त्र आणि विमानविद्द्या अवगत होती?  
 3. नाझका पठारावर दिसलेले धावपट्टीसदृश रस्ते, आणि विमान नीट उतरावे म्हणुन काढलेल्या खुणा.
 4. अँडीज पर्वतावरील पिस्को या डोंगरावर कोरलेला प्रचंड मोठा त्रिशुळ.
 5. ईस्टर आयलंड या केवळ ज्वालामुखीच्या लाव्हा रसानी बनलेल्या बेटावर असलेली पोलादापेक्षाही कठीण असलेल्या पाषाणात कातलेली शिल्पे, ज्यातील चेहरे-पट्टी ही पृथ्वीतलावरील कुठल्याही वंशाशी जुळत नाही.
 6. ईजिप्तमधील स्फिंक्सची प्रतिकृती ब्राझीलमधील रिओ डि जानेरो मधे एका डोंगरावर आढळते. ह्या शिल्पाची मर्यादारेषा स्पष्ट करण्यासाठी जी फिनिशियन चित्रलिपी वापरण्यात आली आहे ती फिनिशियन जमात मध्यपुर्वेत नांदत होती.फिनिशियन लोक मध्यपुर्वेतुन येथे कसे पोचले असावेत ?
 7. तसेच ईजिप्तसारखेच पिरॅमिडस मेक्सिको मधे आहेत.आणि काश्मीर मधील परिहासपुर येथील मंदीराचे भग्नावशेष पिरॅमिडस ची आठवण करुन देते. ( सर्व ठिकाणी किरणोत्सर्ग आहेच.)

या आणि अशा अनेक गोष्टी या पुस्तकात नमुद केल्या आहेत. सर्वकाही इथे मी जागेअभावी नाही लिहू शकत. आणि तसे हे पुस्तक बर्याच जणांनी वाचलेही असेल. तर मनोगतींना याबद्दल काय वाटते हे जाणुन घ्यायला खुप आवडेल. मला तरी हे सर्व वाचल्यावर क्षणभर विश्वास बसतो, की असे काहीतरी घडलेही असेल. तुम्हाला काय वाटते?

* यासंदर्भातील मला जाळावर मिळालेले काही फोटो  इथे टाकले आहेत.

Post to Feed

विषय छान
हे पुस्तक
कुठे मिळेल?
मेहता प्रकाशन पुणे
दुवे
मनोगतावर हा विषय 'जबरा'
धन्यवाद,
डॅनिकनची पुस्तके
हं/ फारसं तथ्य नाही
ह्मम...
सुधारणा
त्यासाठी
ओके..
सहमत/आभार
अजून दोन मराठी पुस्तके
हो..
भयंकर चुकीची माहिती
नमस्कार मृदुला,
चर्चा उद्बोधक
अजून एक स्पष्टीकरण
नमस्कार प्रियाली,
नमस्कार, गैरसमज नको
मानव - संशोधन व प्रतिसंशोधन
अफाट माणूस पण...
धोका

Typing help hide