प्रश्न असे सुटतात का?

कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यात बेळगाव वरून चालु असणाऱ्या प्रश्नाबाबत चाललेल्या मनोगतावरील चर्चेत दोन मनोगती भगिनिंनी दिलेले प्रतिसाद--




  • महाराष्ट्र- कर्नाटक, मराठी- कानडी हा प्रश्न माझ्यापुरता मी सोडवला आहे.

  • मी ही. आपला कर्नाटकाशी काहीही वाद नाही आहेत ते प्रेमाचे आणि सलोख्याचे संबंध. ** आणि माझ्यासारखा हा वाद सोडवण्याचा प्रयत्न इतरांनीही केला तर हा वाद समूळ नष्ट होईल.

 


यावरून या भगिनींना काय म्हणायचे आहे. यांच्या जुन्या लेखनावरून यांनी कर्नाटकी व्यक्तिशी विवाह केला आहे हे कळले.


याप्रमाणेच सगळे प्रश्न सुटतात का? उद्या भारतातील मुलींनी पाकिस्तानातील मुलांशी विवाह केला तर काश्मिर प्रश्न, भारत -पाकिस्तान प्रश्न सुटेल का?


मुळात हे प्रश्न व्यक्तिगत पातळीवर सोडवण्यासारखे आहेत का?


                                                                      जाडु