धर्म आणि तत्त्वे

आज माझा आणि माझ्या मित्राचा ('कृष्ण') वाद चांगलाच रंगला.


विषय होता 'ख्रिस्ती मिशनऱ्यांनी पैशाचे आमिष दाखवून धर्मांतर करणे कितपत बरोबर आहे'.


यामधील एक बाजू अशी की 'कोणाच्या असह्यतेचा फायदा घेऊ नये'. 'क्षणिक मोहाला बळी पडून आपला धर्म कोणत्याही परिस्थित सोडू नये'.


तर दुसरी बाजू अशी की 'धर्मांतर करणे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे'. उदा. जर एखादा माणूस आणि त्याचे कुटुंब गरिबीने मरायला टेकले असतील तर त्याच्या जीवनात धर्माला दुय्यम स्थान असेल. आधी माझे आणि माझ्या कुटुंबाचे पोट कसे भरू हा प्रश्न पडेल. मग तो सहज स्वतःचे धर्मांतर करून घेईल पैशाच्या आमिषाने का होईना.   


यांतून आणखीन एक गोष्ट पुढे आली की माणसाची तत्त्वे मोठी की धर्म ?


की दोन्हीही सारख्याच गोष्टी आहेत ?


'मी कधीही खोटे बोलून स्वतःचा फायदा करून घेणार नाही' हे माझे तत्त्व आणि 'हिंदू' हा माझा धर्म !


आता वरील प्रश्नाशी सांगड घालायची तर , 'मी माझ्या हिंदू धर्माचे कितीही बिकट परिस्थिती (वि. आर्थिक) असली तरीही धर्मांतर करणार नाही' हे तत्त्व की धर्म ? माझ्यामते इथे तत्त्वालाच धर्म असे गृहीत धरले आहे.


आणि 'जो माझ्या मूलभूत गरजा भागवतो तोच माझा धर्म' इथे तत्त्व धर्मापेक्षा श्रेष्ठ मानले आहे. असे तत्त्व बाळगणाऱ्याला कोणताही धर्म मला चालेल असे वाटेल, जरी तो पैशाचे आमिष दाखवून माझ्या मूलभूत गरजा भागवत असेल किंवा माझे पुढील आयुष्य सुखाने जगता येत असेल. आणि दुसऱ्या धर्मातही काही वाईट विचार लिहिले नाहीत, त्याचे पालन करायला. असे म्हणून सहज धर्मांतराला तयार होईल, नाही का?


तर जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा ही नम्र विनंती.


- मोरू