आक्रमक स्वभाव

नमस्कार !


प्रत्येकाचा स्वभाव निरनिराळा असतो, नाहीतर या जगण्याला मजा आली नसती.


मला जेव्हा कोणी विचारतो की तुझ्या स्वभावामधील कमतरता सांग (विशेषतः Personal Interview मध्ये) तर मी सांगतो की माझ्यात 'आक्रमतेचा अभाव' आहे.


नोकरीच्या सुरुवातीला माझ्या स्वभावातील ही कमतरता मला प्रकर्षाने जाणवली. दैनंदिन गोष्टींतही कोणी (अनोळखी) वरच्या आवाजात बोलले की मला तेवढाच आवाज चढवून प्रत्युत्तर देणे जमत नाही. मी शांतपणे त्या व्यक्तीस स्पष्टीकरण देतो.  अर्थात याचे कधी वेगळे परिणामही दिसायचे. कधी समोरची व्यक्ती लगेचच निवळायची किंवा आणखीनच गुर्मीत येऊन बोलायची.


मला कळत नाही की सध्याच्या स्पर्धेच्या युगात आक्रमकता नसणे ही एक कमतरता आहे का ? ज्येष्ठ मनोगतींनी कृपया मार्गदर्शन करावे.


- मोरू