जाड पोह्यांचा चिवडा

  • जाड पोहे ३ मूठी
  • भाजलेले शेंगदाणे १ मूठ
  • लाल तिखट अर्धा चमचा, हळद अर्धपाव चमचा
  • मीठ, तेल, चिमूटभर साखर, चिमूटभर हिंग
३० मिनिटे
१ जण

प्रथम पोहे चाळून घेणे. नंतर कढईत तीव्र आचेवर तेल तापले की मग गॅस बारीक करून पोहे तळून घेणे. हे पोहे चांगले फुलून येतात. पोहे कढईतून काढताना झाऱ्याने व्यवस्थित निथळून घेणे. हे पोहे तेल खूप पितात म्हणून तळून झालेले व झाऱ्याने  पूर्णपणे निथळलेले पोहे पेपरटॉवेलवर पसरून ठेवणे, म्हणजे सर्व तेल कागदाला शोषले जाईल. नंतर हे पोहे एका पातेल्यात घालून त्यात तिखट, हळद, हिंग, साखर, भाजलेले शेंगदाणे (साले काढून)  व चवीनुसार मीठ घालून चमच्याने एकसारखे करणे.

हा चिवडा करायला सोपा आहे. कुरकुरीत व चविष्ट लागतो.

कार्यालयातून आल्यावर गरमागरम चहा बरोबर हा चिवडा खाल्ला तर रात्रीचा स्वयंपाक करण्यास उत्साह येतो.

सिंपल डिंपलची आई