राईस क्रिस्पचा चिवडा

  • केलॉग्सचे किंवा कोणतेही बिनासाखरेचे(गोड चिवडा आवडत असल्यास गोड )राईस क्रिस्प सिरियल
  • फोडणीसाठी २-३ चमचे तेल
  • मोहरी,जीरे, तीळ, कढीपत्ता, किसमीस, शेंगादाने किंवा काजु
  • चवी नुसार तिखट, मीठ
  • हळद, हिंग
  • लिंबूसत्व चिमूटभर
१५ मिनिटे
२-३

फ़ोडणीसाठी तेल गरम  करून त्यात मोहरी,जीरे, तीळ, कढीपत्ता, किसमीस, काजू,हळद, हिंग,चवी नुसार तिखट, मीठ,लिंबूसत्व टाकणे.

फोडणी थोडी गार करावी,(नाहीतर राईस क्रिस्प अगदी चपटे होतात) त्यात राईस क्रिस्प टाकुन परतावे . झाला कुरकुरीत कमी तेलाचा खमंग चिवडा तयार ;-)

कमी वेळात, कमी तेलात पौस्टीक चिवडा तयार होतो.

नणंद आणि स्वानुभव