चक्र

लोक लेख लिहितात. दुसरे ते वाचतात. लेख लिहिता लिहिता रंगत जातात. वाचणारेही मोठ्या आवडीने वाचत असतात. अचानक मग याला उतरती कळा लागते. तेच लेख मग कंटाळवाणे वाटू लागतात. मला कुठे ऐकले आठवत नाही पण म्हणे जगात फक्त सात प्रकारच्या कथा असतात. जेव्हा केव्हा कथा लिहायला प्रारंभ झाला तेव्हापासून बहुदा असेच चढ - उतार चालू असावेत. असे विषय जरी तेच तेच असले तरी बहुदा काळ आणि लेखक वेगवेगळे असल्यामुळे वाचता वाचता आयुष्य मात्र मजेत पुढे जात असते.