बहाणा (गजल)

तोच ठरला शहाणा
ज्यास सुचला बहाणा


तो लाजरा इशारा
कळला न या दिवाणा

त्या सुस्त मैफलीला
लाभो तुझा तराणा


मी थांबलो जिथेही
त्यांचाच तो ठिकाणा


शतकात या विसाव्या
का कायदा पुराणा?


(जयन्ता५२)

(टीपः यातील काही काफिये माझ्याच एका जुन्या गझलेतील आहेत.या इथे ते सर्व नव्या संदर्भात वापरले आहेत.)