केळ्याची वडी

  • केळी ५
  • रवा पाव किलो
  • साखर ५ चमचे
  • दुध १०० ग्राम
१५ मिनिटे
५ जण

केळी, रवा, दुध व साखर एकत्र मिसळुन पातळ सारण करावे.

(जास्त पातळ करु नये, थोडे जाडसर असु द्या)

मग हे सारण कुकरच्या डब्या मधे लावावे (कुकरची शिटी काढुन टाकावी)

३ शिट्या झाल्यावर व कुकर थंड झाल्यावर डबा काढुन (डब्यामधेच) वड्या कराव्यात.

झाल्या वड्या तयार.

आवडल्यास नक्की प्रतिसाद द्यावा

केळी गोड असल्याने साखरेचे प्रमाण आवडी नुसार टाकावे.

आई