मिरची!

मनोगतावरील जाणकारांनी कृपया माहिती द्या.


मिरची सर्वप्रथम भारतात आणि महाराष्ट्रातही अगदी अलीकडे , पोर्तुगीजांनी आणली म्हणतात. त्या अगोदर इथले लोक पदार्थाला तिखटपणा आणण्यासाठी काय करत होते?


शिवाजी महाराजांच्या किंवा त्या पूर्वीच्या काळात मराठी जेवणात तिखट चव आणण्यासाठी काय वापरत असत? मावळ्याने कधी लाल चटणी भाकरी खाल्ली नसेल हे ऐकायला किती विचित्र वाटते नाही?


मराठी जेवणाचा आपण मिरचीशिवाय विचारच करू शकत नाही, मग पूर्वी जेवणातले मुख्य पदार्थ कोणते होते? ते कसे बनवीत असत?


जुन्या मराठी पदार्थांच्या (तिखट) पाककृती कुठे उपलब्ध आहेत का किंवा मनोगतींपैकी कुणाला माहिती आहेत का?


                                                                 साती काळे.