"खाणें" ह्यावर आधारित मराठी वाक्प्रचार

"काय भाव खाते ही मुलगी!" "पाऊस गूम खात नाही!"  इत्यादी "खाणें" ह्या क्रियापदावर आधारित मराठी वाक्प्रचारांचा अभ्यास मी आणि एक सहकारी करतो.  सर्वप्रथम त्या वाक्प्रचारांची व्यवस्थित व पूर्ण यादी बनवता आली तर बरी.  त्या कामासाठी मनोगतकरांची मदत हवी आहेच.  खालील यादीत वीस-एक नोंदलेल्या वाक्प्रचारांपैकी तुम्हाला कोणते ग्राह्य (रूढ, स्वीकार्य) वाटतात?  कोणते अग्राह्य? 


कच खा-, खस्ता खा-, खोट खा-, गूम खा-, झोकांड्या खा-, डोकं खा-, दातओठ खा-, धक्के खा-, धूल खा-, नफा खा-, पैसे खा-, फटके खा-,  बोलणी खा-, भाव खा-, मार खा-, लाच खा-, वेळ खा-, शिव्या खा-,  शेण खा-, हाय खा-, हार खा-


ह्या यादीत नाहीत असे आणखी काही वाक्प्रचार सुचले तर कृपा करून कळवा.                                      


                                            आभारार्थी,   "पीटरराओ"