शेर का बच्चा.... शेर का बच्चा.... !

एकदा एका रेल्वेच्या डब्यात एक मराठी माणूस, आणि एक सरदारजी बसलेले असतात. मराठी माणूस अगदी बारीक असतो. आणि  सरदारजी हट्टाकट्टा असतो. मराठी माणसाला त्याची बॅग वरती ठेवायची असते. त्याला जमत नाही. सरदारजी  त्याला मदत करतो. आणि दंड थोपटून म्हणतो, "शेर का बच्चा.... शेर का बच्चा.... !" त्यांनंतर मराठी माणसाला बर्थ वर करायचा असतो. त्याला तेही अवघड जाते. सरदारजी  त्याला परत मदत करतो आणि दंड थोपटून म्हणतो, "शेर का बच्चा.... शेर का बच्चा.... !"


दुसऱ्या दिवशी मराठी माणसाचे स्टेशन येते, तो स्वतःची बॅग काढायला लागतो तर सरदारजी त्याला बॅग काढून खाली प्लॅटफॉर्म वर उतरवून देतो आणि परत दंड थोपटून म्हणतो, "शेर का बच्चा.... शेर का बच्चा.... !" मराठी माणूस त्याला विचारतो, " भाईसाब, एक बात बताईए, वैसे आपकी मॉ जंगल मे गयी थी या शेर जंगल से आपके घर आया था?"