शाब्दिक रक्तपात

प्रिय मनोगतींनो,


गेल्या काही दिवसात इथे सुरू झालेल्या अनेक चांगल्या चर्चांना एकतर विषयांतराचे वा शाब्दिक रक्तपाताचे गालबोट लागले आहे असे मला वाटते. जर कोणाचे वैयक्तिक मतभेद होत असतील तर ते व्यक्तिगत निरोपाची सोय वापरून एकमेकांना सांगावेत. हे माझे व्यक्तिगत  मत आहे. पण इथला शाब्दिक रक्तपात पाहून चर्चा करावी असे मत झाले. तसेच चर्चेसाठी एखादी संहिती असावी असे वाटते. प्रशासक अनेकदा हस्तक्षेप करून वाद मिटवतात पण तो पर्यंत वेळ झालेला असतो.


एकूण आमचीच लाल म्हणण्यातला जोष पाहिला की वाटत ज्यांना मराठी माहीत नाही त्यांना निदान मराठी माणसं आपल्यातच कसे बेताल भांडतात ते कळणार नाही. हे बरं.


आता या वर सुद्धा असेच अनेक आरोप होतील. पण हे माझं मत आहे. या चर्चा फारच वाहवत गेल्या अन पुढे अस होऊ नये या बद्दल आपल्याला काय वाटत? शाब्दिक रक्तपात कसा थांबवावा. मी माझे मत मांडले आहे आणि या चर्चेत कोणाचाही मुद्दा खोडून काढायचा प्रयत्न करणार नाही. कोणाला माझे वैयक्तिक मत चुकीचे वाटत असेल तर व्यक्तिगत निरोपाची सोय आहे त्याचा वापर करावा.