सफरचंदाची मिठाई: ऍपल पाय

  • ५/६ सफरचंदे,३/४ मेज चमचे साखर(टेबल स्पून),मूठभर बेदाणे
  • १००ग्राम मैदा,६० ग्राम लोणी,६०ग्राम साखर,१चिमूट मीठ
  • १चहाचा चमचा दालचिनी पावडर,बदाम तुकडे १ मूठ
१ तास
४/५ जणांसाठी (कसेबसे) पुरेसे

जर्मनी मध्ये ,त्यात ही हेसन मध्ये सफरचंदे फार..प्रत्येकाच्याच बागेत लगडलेली,भाराने वाकलेली झाडे!(कुंपणात जाऊन तोडण्याच्या कोणी फंदात पडत नसल्याने )त्यामुळे सफरचंदाचे पदार्थ भरपूर!

सफरचंदांची साले काढणे,लहान तुकडे करणे,त्यात ३/४ चमचे साखर + बेदाणे+बदाम तुकडे घालावे.हे मिश्रण बटर लावलेल्या बेकिंग ट्रे मधे पसरुन ठेवावे.

मैदा+साखर+लोणी+मीठ + दालचिनी पावडर एकत्र करुन चांगले मळावे. त्याच्या बारीक,बारीक गोळ्या,गुठळ्या कराव्या,व त्यांनी बेकिंग ट्रे मधील सफरचंदांचे मिश्रण झाकून टाकावे.

१८० अंश से. तापमानावर ३०-३५ मिनिटे बेक करावे.

वॅनिला आईस क्रीम बरोबर (कॅलरींचा विचार न करता) खावे.

 

 

गरम/कोमट/गार कसाही चांगला लागतो.

वॅनिला आईस ऐवजी व्हीप्ड क्रीम घालून पण छान लागते.

 

माझी शेजीबाई: त्सेंटा आजी