कोळाचे भरीत

  • एक नारळ
  • एक वांगे(मोठे काळे)
  • गूळ(साधारण एका लिंबाएवढा)
  • चिंच ( एका लिंबाएवढी)
  • एक टेबलस्पून तेल
  • फोडणीचे साहित्य (मोहरी,हिंग,हळद) व २/३ हिरव्या मिरच्या
३० मिनिटे
२ ते ३ जणांना

एक नारळ खोवून त्याचे दूध काढून घ्यावे. (खोवलेल्या नारळांत वाटीभर कोमट पाणी टाकून मिक्सर मधून काढावा)

वांग्याला वरुन तेलाचा हात लावून ते गॅसवर सर्व बाजूंनी नीट भाजून घ्यावे. गार झाल्यावर साले काढून टाकवीत . नारळाच्या दूधात चिंचेचा कोळ, गूळ व चवीनुसार मीठ घालावे. वांग्याचा गर  चमच्याने सारखा करुन घालावा. मोहरी,हिंग,हळद व मिरच्यांची फोडणी करुन ती वरील मिश्रणावर ओतावी. चविष्ट असे कोळाचे भरीत तयार!

वांग्याची भाजी अजिबात न आवडणारी मी हे भरीत मात्र अतिशय आवडीने खाते. गरमगरम मुडाखि बरोबर हे भरीत खावे. 

सौ. आई