कारल्याची पानगी

  • एक मोठे कारले
  • ३ वाट्या तांदुळाचे पीठ
  • २ मोठे कांदे
  • ३/४ हिरव्या मिरच्या
  • १ टेबलस्पून तेल
  • केळीची पाने-२
३० मिनिटे
२ जणांना

कारले बारीक चिरुन त्याला मीठ लावून ठेवावे. १० मिनिटांनंतर कारलयाला सुटलेले पाणी काढून टाकावे (कारले घट्ट पिळून घ्यावे.) तांदुळाचे पीठ,बारीक चिरलेला कांदा व हिरव्या मिरच्या व पाणी काढून टाकलेले कारले हे सगळे एकत्र करुन,थोडे पाणी घालून मळून घ्यावे. (थालिपीठासारखे थापता येईल इतपत घट्ट/सैलसर करावे.)

केळीच्या पानावर वरील मिश्रणाचे एक गोळा घेऊन हलक्या हाताने थापावा. त्यावर दुसरे केळीचे पान ठेवावे व तव्यावर किंचीत तेल घालून मंद आचेवर भाजावे.

गरमगरम पानगी तयार! वर ठेवलेल्या केळीच्या पानामुळे पानगी नीट आतपर्यंत शिजते. केळीच्या पानामुळे आणी कारल्याच्या स्वादामुळे एक वेगळीच छान चव येते. कारल्याचा कडवटपणा जाणवतही नाही

 

गरमगरम पानगी  लोणी लावून खावी. नारळाच्या चटणीबरोबर ही सुंदर लागते.

सौ. आई