भोंडला (हादगा) खेळताना हत्तीची प्रतिमा का वापरतात?

काही वेळापूर्वी मेसमध्ये जेवायला चाललो असताना शनिवारवाड्यापाशी काही महिला भोंडला खेळत होत्या. मध्ये हत्तीची प्रतिमा होती. लहानपणापासून हे चित्र मी पाहत आहे. मनात प्रश्न आला, की कमळ, स्वस्तिक ,अशी अनेक विविधार्थी प्रतिके आपल्याकडे असताना केवळ हत्तीचेच चित्र / प्रतिमा भोंडल्याच्या वेळी का वापरले जाते. गजान्तलक्ष्मी म्हणावे तर तीही कल्पना पुरेशी वाटत नाही. देवीचे वाहन म्हणावे तर नऊ दिवस नऊ वाहने वापरली जातात. मग केवळ हत्तीचीच निवड का केली गेली असावी? मुळात भोंडला का खेळतात, याचाही शोध घ्यायला हवा.