जैन धर्म - हिंदू धर्म

गुजरातमध्ये मोदी सरकाराने जैन धर्म हा हिंदू धर्माची उपजात आहे असे घोषित करून जैनांमध्ये एक वादळ निर्माण केले आहे त्या विषयी थोडे माझे मत :


प्रथम : हिंदू धर्म हा साधारणता ९-११ हजार वर्षापूर्वी अस्तित्वात आला असे बुद्धिजीवी मानतात तर सामान्यता धर्म ग्रंथ, वेद पुराण ह्याच्या नुसार कमीत कमी २०००० वर्षापूर्वीचा. (सर्व आकडे हे कधी ना कधी इतर जागी वाचलेले आहेत तेंव्हा ह्याचा वापर हा संदर्भ म्हणून करीत आहे)


जैन धर्म हा साधारणता ५००० ते ६५०० वर्षापूर्वी पासून चा (आधार जैन धार्मिक ग्रंथ व महाजाल माहिती) 


जर संपूर्ण पणे जैन - हिंदू -जैन धार्मिक ग्रंथांचाच उपयोग करून आकडेवारी जरी केली तरी फरक हा माझ्या मते हजारो वर्षांचाच पडेल, व जैन धर्म हा हिंदू धर्मापेक्षा नवीन असेल.


माझ्या माहिती नुसार जैन धर्माबद्दल जी माहिती आहे ती खालील प्रमाणे :


जेव्हा वेदांचा - पुराणांचा गैरवापर करून हिंदू धर्मात पुजे तथा कर्मकांडामध्ये जीवबळी व इतर प्रकार चालू झाले तेंव्हा काही लोकांनी त्याचा विरोध केला व विरोधाचे कारण पुढे करून हा गट बाहेर देखिल पडला व त्यांनी जैन धर्म (अहिंसा धर्म) निर्माण केला ( लहानपणी वाचलेली अथवा लोक कथा)


जैन धर्माचे संस्थापक महावीर स्वामी होते, पण त्या आधीच ह्या धर्माचे २३ तिर्थंकर झाले होते महावीर हे २४ वे. मग मागील तिंर्थंकर व खुद्द महावीर स्वामी ह्यांचा धर्म कोणता ? कारण महावीर स्वामीच्या आधी जैन धर्म नावाची संकल्पना देखिल अस्तित्वात नव्हती, आद्य तिर्थंकर स्वामी वृषभदेव पासून ते महावीर स्वामी पर्यंत वेगळा धर्मच नव्हता जर असेल ही तर तो हिंदू धर्मच असावा, ह्या ला पर्याप्त पुरावे आहेत, जसे जैन धार्मिक ग्रंथामध्ये अग्नी, वरुण, जल, इंद्र, स्वर्ग, मोक्ष (मुक्ती) ह्या संकल्पना / देव-देवता आह्रेत ज्या हिंदू धर्मामध्ये देखिल आहेत तसेच जैन ही संकल्पनाच महावीर स्वामी नी तयार केली पण जैन धर्म हा अस्तित्वात आला तो कमीत कमी महावीर नंतर १००० ते २००० वर्षानंतर. जैन धर्माचा प्रथम वापर उमास्वाती ह्यांनी आपल्या ग्रंथामध्ये केला. तर महावीर पूर्वी व महावीर नंतर उमास्वाती पर्यंत मूळ जैन हा हिंदूच असावा.


स्वाभाविक पणे जर विचार केला तर त्याकाळी दोन धर्म अस्तित्वात असावेत एक हिंदू धर्म व एक जो काळाच्या पडद्या आड गेला तो धर्म. त्या काळी दुसरा कुठला ही धर्म असावा असे वाटत नाही जाणकारांनी माहिती प्रदान करावी.