'गांधीगिरी' की 'सावरकरगिरी'

नमस्कार,


गांधीजींची मते (सत्याग्रह, अहिंसा इ.) देशाच्याच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या माध्यमांतर्फे पोहचली. पण मला खटकते की त्यामानाने टिळक, सावरकरांची मते लोकांपर्यंत पोहचली नाहीत किंवा ती जवळ-जवळ महाराष्ट्रापर्यंतच मर्यादीत राहीली. माझ्या मते हे खुपच परस्परविरोधी आहे. एकीकडे सावरकरांना पुजायचे आणि दुसरीकडे 'गांधीगिरी'चे कौतुक करायचे. सावरकरांची मते गांधीच्या विरोधी होती. उदा.


१. भारतवासीयांनो शत्रुवर प्रेम करा व त्याच्यावर विश्वास ठेवा (गांधी) वि. शत्रुवर प्रेम अथवा विश्वास ठेवला जात नाही (सावरकर)


२. अहिंसेचा मार्ग स्विकारा. कोणी एका गालावर थोबाडीत मारली तर दुसरा गाल पुढे करा  वि.  स्वरक्षण करणे हिंसा नव्हे. मुर्ख हिंदूनो एक गळा कापला तर पुढे करायला दुसरा गळाच उरत नाही.


३. मी पण एक हिंदु आहे. हिंदुचे सर्व देव शांतीचा संदेश देतात  वि.  तुम्ही पोकळ हिंदु आहात. श्रीरामाच्या हातात धनुष्यबाण आहे आणि श्रीकृष्णाच्या हातात सुदर्शनचक्र. सज्जनांच्या रक्षणाकरता देवांनाही हातात शस्त्र घ्यावी लागतात.


४. हाती शस्त्र घेणे कधीही वाईट होय. शत्रुशी लढायचे असेल तर त्यांच्या तत्त्वांशी लढा वि. युद्धात तत्त्वे नव्हे तर तलवारी टिकतात व जिंकतात. राष्ट्राच्या सीमा ह्या फक्त  तलवारीने आखता येतात तत्त्वांनी नव्हे.


५. तलवारीने नको हृदयपरिवर्तना वर विश्वास ठेवा. शत्रुचे मन जिंका. वि. ज्याने आपल्याला मारायचे ठरविले आहे त्याचे मन जिंकता येत नाही. हे हिंदुनो अफजलखानाचे हृदय परिवर्तन करता येत नाही हृदय फोडावे लागते.


६. (गांधीना उद्देशून) तुमच्याच आहारी जाऊन हिंदू एवढे हीन झाले आहेत की त्यांना त्यांच्या बायका मुलांचे रक्षण पण करू नये ही फार शरमेची गोष्ट आहे.


- सावरकरांची ही मते वाचून अजूनही आपण 'गांधीगिरी'वर विश्वास ठेवता काय ?


- आपण कोणाला मानता ? 'गांधीगिरी'ला की 'सावरकरगिरी'ला ?


- मोरू